Home / News / आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशीचव्यावसायिक एलपीजीच्या दरात कपात

आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशीचव्यावसायिक एलपीजीच्या दरात कपात

मुंबई- आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरची किंमत कमी केली आहे. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे. १ एप्रिल...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

मुंबई- आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरची किंमत कमी केली आहे. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे. १ एप्रिल २०२५ रोजी तेल आणि गॅस मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कपात केली असून दिल्ली ते मुंबई गॅस सिलिंडरचे दर ४१ रुपयांनी कमी झाले आहेत. मात्र, तेल कंपन्यांनी केवळ १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत कपात केली तर, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमती स्थिर आहेत.
आजपासून दिल्लीत व्यावसायिक एलपीजी सिलिंडर रिफिल करण्यासाठी ग्राहकांना आता १ हजार ७६२ रुपये मोजावे लागतील तर मुंबईत व्यवसायिक सिलिंडरची किंमत १ हजार ७१४ रुपयांपर्यंत खाली आली आहे, जी याआधी १ हजार ७७५ रुपये होती. कोलकातामध्ये व्यावसायिक सिलिंडर १ हजार ८७२ रुपयांना उपलब्ध होईल, पूर्वी त्याची किंमत १ हजार ९१३ रुपये होती. चेन्नईमध्ये आता व्यावसायिक सिलिंडरची नवीन किंमत १ हजार ९२४ रुपये झाली आहे. पूर्वी ती १ हजार ९६५ रुपये होती. या निर्णयामुळे हॉटेल तसेच इतर व्यावसायिकांना चांगलाच फायदा होणार आहे.

Web Title:
संबंधित बातम्या