इम्रान खान निवडणुकीतून ‘आऊट’ आयोगाने उमेदवारी अर्ज नाकारले

कराची – विविध आर्थिक घोटाळ्यात अडकलेले पाकिस्ताचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना निवडणूक आयोगाने दणका दिला. आयोगाने त्यांचे निवडणूक उमेदवारी अर्ज नाकारले आहेत. त्यामुळे इम्रान खान निवडणुकीतून आऊट झाले आहेत.
इम्रान खान यांनी 2024 मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय निवडणुका दोन मतदारसंघांत उमेदवारी अर्ज भरले होते. त्यातील एक अर्ज त्यांच्या जन्मगाव असलेल्या मियानवली येथून भरला होता. हे दोन्ही अर्ज नाकारण्यात आले आहेत. आयोगाने म्हटले आहे की, ‘इम्रान खान यांचे अर्ज नाकारण्यात आले आहेत. कारण ते मतदारसंघांचे नोदणीकृत मतदार नाहीत.`
इम्रान खान यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दोषी ठरल्यामुळे 8 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत लढण्यास अपात्र ठरवण्यात आले. तरीही त्यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top