Home / News / इस्रोची दुसरी स्पाडेक्स डॉकिंग मोहीमही यशस्वी

इस्रोची दुसरी स्पाडेक्स डॉकिंग मोहीमही यशस्वी

मुंबई – इस्रोची दुसरी स्पाडेक्स डॉकिंग मोहीमही यशस्वी झाली आहे. या मोहिमेत दोन उपग्रहांना एकमेकांशी जोडण्याची प्रक्रिया पार पडली. विज्ञान...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

मुंबई – इस्रोची दुसरी स्पाडेक्स डॉकिंग मोहीमही यशस्वी झाली आहे. या मोहिमेत दोन उपग्रहांना एकमेकांशी जोडण्याची प्रक्रिया पार पडली. विज्ञान तंत्रज्ञान, अणुऊर्जा आणि अंतराळ विभागाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी एक्सवरून ही माहिती दिली आहे. पीएसएलव्ही – सी ६०/ स्पाडेक्स मोहिमेचे प्रक्षेपण ३० डिसेंबर २०२४ रोजी झाले होते. त्यानंतर उपग्रहांचे पहिले डॉकिंग १६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ६.२० वाजताच्या सुमारास यशस्वीरित्या पूर्ण होऊन १३ मार्च २०२५ रोजी सकाळी ९.२० वाजताच्या सुमारास ते यशस्वीरित्या अनडॉक झाले. या मोहिमेतील पुढील प्रयोग येत्या दोन आठवड्यांत राबवले जाणार आहेत. या कामगिरीमुळे भारत अंतराळात डॉकिंग तंत्रज्ञान असलेला जगातील चौथा देश बनला आहे. ही मोहीम यशस्वीरित्या पार पाडणाऱ्या देशामध्ये रशिया, अमेरिका आणि चीन या देशांचा समावेश आहे.

Web Title:
संबंधित बातम्या