Home / News / उत्तर कोरियाने पुन्हा कचऱ्याचे फुगे सोडले

उत्तर कोरियाने पुन्हा कचऱ्याचे फुगे सोडले

सेऊल- उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग ऊन याने पुन्हा एकदा विष्ठाआणि कचऱ्याने भरलेले फुगे दक्षिण कोरियाच्या दिशेने सोडले.आता उत्तर कोरियाने...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

सेऊल- उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग ऊन याने पुन्हा एकदा विष्ठाआणि कचऱ्याने भरलेले फुगे दक्षिण कोरियाच्या दिशेने सोडले.आता उत्तर कोरियाने सोडलेल्या फुग्यांना प्रत्युत्तर देण्याची तयारी दक्षिण कोरियाने केली आहे.त्यामुळे या दोन्ही देशांमधील तणाव पुन्हा वाढला आहे.

दक्षिण कोरियाने उत्तर कोरियाविरुद्ध प्योंगयांगविरोधी प्रचार प्रसार पुन्हा सुरू केला होता. त्यानंतर दोनच दिवसांनी उत्तर कोरियाने ही कारवाई केली.दक्षिण कोरियाच्या जॉइंट चीफ ऑफ स्टाफने उत्तर कोरियाचे फुगे दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलच्या उत्तरेकडे सीमा ओलांडल्यानंतर उडत असल्याची माहिती दिली. आहे.आकाशात फुग्यासोबत दिसणार्‍या वस्तूंपासून लांब रहा आणि जमिनीवर असा फुगा आढळल्यास पोलीस किंवा लष्करी अधिकार्‍यांना माहिती द्यावी, असे आवाहन दक्षिण कोरियाच्या जॉइंट चीफ ऑफ स्टाफने केले आहे.

Web Title:
संबंधित बातम्या
Maharashtra Rain

Maharashtra Rain : पुढील ४८ तासांत ‘मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, वीकेंडला घराबाहेर पडण्यापूर्वी हवामानाचा ‘हा’ अंदाज नक्की वाचा- राज्यातील प्रमुख जिल्ह्यांना २७ जुलैपर्यंत रेड आणि ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी