Home / News / उल्हासनगरात गादीच्या कारखान्याला आग

उल्हासनगरात गादीच्या कारखान्याला आग

नवी मुंबई – उल्हासनगरच्या शांतीनगर रस्त्यावर असलेल्या सोलापूर गादी कारखान्याला काल आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले व...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

नवी मुंबई – उल्हासनगरच्या शांतीनगर रस्त्यावर असलेल्या सोलापूर गादी कारखान्याला काल आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले व त्यात संपूर्ण दुकान जळून खाक झाले.
कारखान्यात मोठ्या प्रमाणात कापड आणि कापूस साठवलेले असल्याने आग मोठ्या प्रमाणात पसरली. उल्हासनगर महापालिका अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी पोहोचून, शर्थीच्या प्रयत्नांनी त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. आगीची तीव्रता इतकी होती की संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले होते. या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Web Title:
संबंधित बातम्या