उष्णतेच्या लाटेमुळे दिल्लीत रुग्णवाहिका तैनात करणार

नवी दिल्ली
देशात निवडणुकांचा ज्वर वाढत असताना नवी दिल्लीमध्ये उष्णतेची लाटही सुरु आहे. त्यामुळे उन्हातान्हात प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी दिल्लीत रुग्णवाहिका तैनात करण्यात येणार आहेत.
लोकसभा निवडणुकांचा प्रचार हा दिवसभर सुरु असतो. त्यावेळी रॅली, प्रचारसभा होत असतात. यामध्ये अनेक कार्यकर्ते सहभागी होत असतात. दिल्लीत सर्वसाधारण तापमान हे अधिक असते. त्याचप्रमाणे इथे दुपारी गरम वारेही वाहात असतात. त्यामुळे उन्हाच्या तडाख्याने कार्यकर्त्यांना त्रास होऊ शकतो. उन्हाच्या काळात जळजळ, स्ट्रोक, हृदविकार व इतरही त्रास होऊ शकतो .!अशा वेळी तातडीची मदत मिळावी म्हणून निवडणूक रॅली व प्रचारसभांच्या स्थळी रुग्णवाहिका तैनात केल्या जाणार आहेत. दिल्लीचे आरोग्य महासंचालक डॉक्टर अजय शुक्ला यांनी ही माहिती दिली. या रुग्णवाहिकेमध्ये उन्हाचा त्रास झालेल्या रुग्णांसाठी खास सुविधा पुरवण्यात येणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top