Home / News / एलॉन मस्क यांच्या आईने मुंबईत साजरा केला वाढदिवस

एलॉन मस्क यांच्या आईने मुंबईत साजरा केला वाढदिवस

मस्क यांनी बुके पाठवलामुंबई – अमेरिकेचे अब्जाधिश उद्योगपती आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळातील विशेष खात्याचे मंत्री एलॉन मस्क यांच्या...

By: E-Paper Navakal


मस्क यांनी बुके पाठवला

मुंबई – अमेरिकेचे अब्जाधिश उद्योगपती आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळातील विशेष खात्याचे मंत्री एलॉन मस्क यांच्या मातोश्री माये मस्क यांनी मुंबईत आपला ७७ वा वाढदिवस उत्साहात साजरा केला. मस्क यांनी आपल्या आईला वाढदिवसानिमित्त अमेरिकेहून बुके पाठवला आणि त्यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या.
माये मस्क यांनी एक्स सोशल मीडियावर पोस्ट करून पुत्र एलॉन यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. आणि आपल्या वाढदिवसानिमित्त आठवणीने पुष्पगुच्छ पाठविल्याबद्दल आभार प्रदर्शित केले.
दर पाच वर्षांनी माये यांचा वाढदिवस दिमाखात साजरा करायचा अशी मस्क कुटुंबियांची परंपरा राहिली आहे. माये यांनी त्याची आठवण आपल्या पोस्टमधून करून दिली.

Web Title:
संबंधित बातम्या