ऑस्कर विजेत्या अभिनेत्याचा मृतदेह कारमध्ये आढळला

सेऊल – ऑस्करविजेता चित्रपट पॅरासाइटमधील अभिनेता ली सन-क्यूनचा मृतदेह काल कारमध्ये आढळला. ली सन-क्यूनने काल सुसाईड नोट लिहून घर सोडले. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. काही दिवसांपुर्वी अंमली पदार्थाच्या सेवनाच्या संशयावरून अभिनेत्याची चौकशी सुरू होती.
ली सन-क्यून सुसाईड नोट लिहून बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या पत्नीने पोलिसांत नोंदवली होती. यानंतर पोलिसांनी लीचा शोध सुरु केला. शोधमोहिनेच्या दुसऱ्या दिवशी लीची कार निर्मनुष्य ठिकाणी सापडली. त्यात तो मृतावस्थेत आढळला. ऑक्टोबरमध्ये अंमली पदार्थाच्या सेवनाच्या संशयावरून लीची चौकशी सुरू होती. ली सन क्यून अनेक वर्षांपासून दक्षिण कोरियामधील सिनेमांमध्ये काम करत होता. पॅरासाइट हा त्यांचा सर्वात मोठा आणि गाजलेला चित्रपट होता. या चित्रपटाने ऑस्कर जिंकला होता. याशिवाय लीने माय मिस्टर, कॉफी प्रिन्स माय स्वीट सोल, मिस कोरिया आणि ए हार्ड डे मध्येदेखील भूमिका केल्या होत्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top