Home / News / कणकवलीच्या हुंबरट गावात रविवारी पावणादेवीचा जत्रोत्सव

कणकवलीच्या हुंबरट गावात रविवारी पावणादेवीचा जत्रोत्सव

कणकवली – तालुक्यातील हुंबरट गावातील श्री पावणादेवीचा जत्रोत्सव रविवार १ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

कणकवली – तालुक्यातील हुंबरट गावातील श्री पावणादेवीचा जत्रोत्सव रविवार १ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी म्हणून पावणादेवीची ख्याती आहे.
या जत्रोत्सवात दिवसभर विविध धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन जत्रोत्सवात केले जाते. त्यामध्ये देवांचे डाळप फेरी, देवांचे आगमन व स्वागत मान्यवरांचे स्वागत व आभार प्रदर्शन,देवीची ओटी भरणे व नवस फेडणे, महाप्रसाद,पंचारत, दशावतारी नाटक आणि सुवर्णाचे ताट आदी कार्यक्रमांचा समावेश आहे. तरी सर्व भाविकांनी जत्रोत्सवास उपस्थित राहावे असे आवाहन देव बाणकीलिंग पावणादेवी न्यास, हुंबरट ग्रामविकास मंडळ,मुंबई देवस्थान मानकरी व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title:
संबंधित बातम्या