कार्तिकी एकादशी निमित्त पंढरीत१० लाख बुंदी लाडवांचा प्रसाद

सोलापूर :

विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समिती कार्तिकी यात्रेकरिता प्रसादाचे १० लाख बुंदी लाडू बनवणार आहे. कार्तिकी एकादशी अवघ्या २ दिवसांवर आल्याने लाडू बनवण्याची लगबग सुरू असून, दररोज सुमारे ५० हजार बुंदी लाडू तयार करण्यात येत आहेत.

विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीचे कर्मचारी हे बुंदी लाडू बनवत आहे. बुंदी लाडू तयार करण्यासाठी बेसन, साखर, डबल फिल्टर शेंगदाणा तेल, बेदाणे, काजू, वेलदोडा, जायफळ आदी जिन्नसांचा वापर केला जात आहे. दररोज दिवस व रात्रपाळीमध्ये मिळून सुमारे ६५ कर्मचारी लाडू बनवण्याचे काम करीत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून दररोज ५० हजार लाडू बनविण्यात येत आहेत. आचाऱ्यासह महिला व पुरुष कर्मचारी बुंदी तयार करणे, लाडू बनवणे, लाडू पॅकिंगचे काम करीत आहेत. पर्यावरणपूरक अशा बटर पेपरच्या पिशवीमध्ये लाडूचे पॅकिंग करण्यात येत आहे. लाडू पॅकिंग झाल्यानंतर वाहनाद्वारे ते विठ्ठल मंदिर समितीच्या लाडू केंद्रावर विक्रीसाठी पाठविले जात आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top