Home / News / कुंद्राला आज ईडी समोर हजर राहण्याचे आदेश

कुंद्राला आज ईडी समोर हजर राहण्याचे आदेश

मुंबई – पोर्नोग्राफी प्रकरणी उद्योगपती आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला ईडीने समन्स बजावून उद्या चौकशीसाठी मुंबई ईडी कार्यालयात...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

मुंबई – पोर्नोग्राफी प्रकरणी उद्योगपती आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला ईडीने समन्स बजावून उद्या चौकशीसाठी मुंबई ईडी कार्यालयात सकाळी ११ वाजता हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. ईडीने राज कुंद्रा व त्यांच्याशी संबंधित अन्य व्यक्तींच्या मुंबई आणि उत्तर प्रदेशातील काही शहरातील घर, कार्यालयांमध्ये १५ ठिकाणी छापेमारी केली होती. या छापेमारीनंतर राज कुंद्रा आणि पोर्नोग्राफीशी संबंधित इतर लोकांनाही समन्स बजावले असून त्यांनादेखील चौकशीसाठी मुंबई ईडी कार्यालयात बोलावले आहे.
राज कुंद्राचे वकील प्रशांत पाटील यांनी सर्व आरोप फेटाळले असून, कुंद्रा यांनी मनी लॉड्रिंगसारखा गुन्हा केलेला असून ते निर्दोष असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, पॉर्नोग्राफी प्रकरणी शिल्पा शेट्टीच्या नावाचीही चर्चा सुरू झाल्यावर राज कुंद्राने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत माध्यमांना इशारा दिला की, पत्नी शिल्पा शेट्टीचे नाव वारंवार या प्रकरणात ओढणे खपवून घेतले जाणार नाही.
पोर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्राव र लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ विकून जमा झालेला पैसा परदेशात हस्तांतरित केल्याचा आरोप आहे. ईडीकडून सध्या याचा तपास सुरू आहे. याआधी राज कुंद्राला जून २०२१ मध्ये अश्लील व्हिडिओ बनवल्याप्रकरणी अटक झाली होती. सुमारे दोन महिन्यांनंतर , सप्टेंबर २०२१ मध्ये त्याला जामीन मिळाला होता.

Web Title:
संबंधित बातम्या