केरळमध्ये ख्रिसमस उत्सवादरम्यान पूल कोसळल्याने अनेक जखमी

तिरुवनंतपुरम – केरळची राजधानी तिरुवनंतपुरममध्ये काल रात्री ख्रिसमसच्या उत्सवादरम्यान एक तात्पुरता उभारण्यात आलेला पूल कोसळला. काल रात्री ९ वाजण्याच्या सुमारास अनेक जण या पुलावर चढले होते. जास्त भार झाल्याने पूल एका बाजूला झुकला आणि खाली कोसळला. या दुर्घटनेत ७ ते ८ जण जखमी झाले. जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे. तिरुवनंतपुरममध्ये काल ख्रिसमच्या उत्सवानिमित्ताने एक खास पूल बांधण्यात आला होता. धबधबा, येशूचा जन्म आणि इतर देखावे पाहण्यासाठी हा पूल उभारण्यात आला होता. एका वेळी अनेक लोक या पूलावर चढले. त्यामुळे हा पूल खाली कोसळला. यानंतर नागरिकांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी इतर नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top