कोकणकड्यावरून उडीमारून तरुणीची आत्महत्या

नाशिक

हरिश्चंद्रगडवरील कोकणकड्यावरून उडी मारून मुंबईतील एका २२ वर्षीय तरूणीने आत्महत्या केली. अवनी मावजी भानुशाली असे या तरूणीचे नाव आहे. तिच्या बॅगेत एक चिठ्ठी सापडली. चिठ्ठीमध्ये म्हटले आहे की, ‘आई, बाबा मला माफ करा. मी खूप विचार करून हे सर्व करत आहे. त्याबद्दल मला माफ करा, मला कोणीही मदत करू शकले नाही. मला खुप काही सांगायचे आहे, पण ते सांगू शकत नाही, शब्दांत व्यक्त करणे खूप अवघड आहे. मी प्रार्थना करते की जगात असे पाऊल कोणीही उचलू नये.’

अवनी रविवारी हरिश्चंद्रगडावर गेली होती. त्यानंतर दुपारी अडीज वाजण्याच्या सुमारास तीने कोकणकड्याच्या उजव्या बाजूकडे जात सुमारे १४०० फूट खाली उडी घेतली. तेथे उपस्थित असलेल्या गिर्यारोहकांच्या लक्षात येताच त्यांनी कोकणकड्याच्या उजव्या बाजूला धाव घेतली. मात्र तोपर्यंत अवनी नजरेआड झाली होती. त्यानंतर तातडीने राजुर पोलीस, पुण्याचे गिर्यारोहक रेस्क्यू पथक आणि अवनीच्या कुटूंबियांना याबाबत माहिती देण्यात आली. रेस्क्यु पथकाने घटनास्थळी दाखल होऊन शोधमोहिम सुरु केली. सोमवारी सुमारे नऊ तासांच्या परिश्रमानंतर अवनीचा मृतदेह कोकणकड्यावरून गडावर आणला गेला. राजुर पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली असून राजुर पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top