मुंबई- मुंबई-कोस्टल रोडवरील दक्षिण मुंबईत जाणारा बोगदा आज रात्री ९ वाजल्यापासून २ सप्टेंबर सकाळी ७ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद असणार आहे. तपासणीच्या कामासाठी बोगद्यातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. अशी माहिती मुंबई वाहतूक पोलिसांनी दिली. तर प्रवाशांना मुकेश चौक आणि एनएस पाटकर रोड मार्गे प्रवास करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
