Home / News / खासगीरीत्या दहावी- बारावी अर्ज मुदत ३० सप्टेंबपर्यंत!

खासगीरीत्या दहावी- बारावी अर्ज मुदत ३० सप्टेंबपर्यंत!

मुंबई- दहावी आणि बारावीच्या परीक्षेला खासगीरीत्या म्हणजे फॉर्म नंबर १७ भरून बसणार्‍या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा अर्ज भरण्याची मुदत ३० सप्टेंबर जाहीर...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

मुंबई- दहावी आणि बारावीच्या परीक्षेला खासगीरीत्या म्हणजे फॉर्म नंबर १७ भरून बसणार्‍या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा अर्ज भरण्याची मुदत ३० सप्टेंबर जाहीर करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत खासगीरीत्या घेतल्या जाणार्‍या दहावी व बारावीच्या परीक्षेचे नियोजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.ही परीक्षा फेब्रुवारी- मार्च महिन्यात घेतली जाणार आहे. त्यासाठी फॉर्म नंबर १७ भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर असल्याचे शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आले आहे.तसेच अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन शुल्क भरल्याची पावती तसेच मूळ कागदपत्रे संबंधित शाळेत किंवा कनिष्ठ महाविद्यालयात जमा करायचे आहे.

Web Title:
संबंधित बातम्या