गाझा,इस्रायलमधील रुग्णालयांना इलॉन मस्क यांचा मदतीचा हात

वॉशिंग्टन

इस्रायल आणि हमासमधील युद्ध अजूनही सुरूच आहे. त्यातच गाझा आणि इस्रायलमधील रुग्णालयांना मदत करणार असल्याचे एक्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि प्रसिद्ध उद्योजक इलॉन मस्क यांनी जाहीर केले. एक्स आपल्या जाहिरातींचा महसूल युद्धग्रस्त गाझा आणि इस्रायलमधील रुग्णालयांना दान करेल, असे त्यांनी यावेळी घोषित केले.

एक्सचे मालक झाल्यापासून मस्क यांनी अनेक भन्नाट निर्णय घेतले आहेत. मध्यंतरी ‘दहशतवादी संघटनांसाठी एक्सवर कोणतेही स्थान नाही’ असे सांगत हमासशी संलग्न असेली अनेक अकाऊंट त्यांनी हटवली होती. आता त्यांनी हमास आणि इस्रायलच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण अशी घोषणा केली आहे. दरम्यान, आत्तापर्यंत या युद्धात १३,००० हून अधिक लोक मारले गेले, तर हजारो लोक जखमी झाले. गाझामधील रुग्णालये या हल्ल्यात अक्षरशः उद्ध्वस्त झाली आहेत. अशा स्थितीत मस्क यांनी घेतलेल्या निर्णयाचे जगभर कौतुक होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top