गुगलने कर्मचाऱ्यांना काढले वर्षातील दुसरी नोकरकपात

कॅलिफोर्निया :

गुगलने पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. खर्चात कपात करण्यासाठी कर्मचाऱ्यांची संख्या कमी केली जात आहे, असे कंपनीने म्हटले आहे. कपात केलेल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. कर्मचारी कपातीमुळे काही लोकांना भारत, शिकागो, अटलांटा आणि डब्लिनसह कंपनी गुंतवणूक करत असलेल्या ठिकाणी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. २०२४ या वर्षातील गुगलची ही दुसरी नोकरकपात आहे.

यंदा टेक आणि मीडिया कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे यापुढेही कर्मचारी कपात होण्याची भीती आहे. काल प्रसिद्ध झालेल्या बिझनेस इनसाइडरच्या अहवालानुसार, गुगलच्या रिअल इस्टेट आणि वित्त विभागातील अनेक कर्मचाऱ्यांना या कपातीचा फटका बसला आहे. अहवालात असे म्हटले आहे की, कर्मचारी गुगल ट्रेझरी, बिझनेस सर्व्हिसेस आणि रेव्हेन्यू कॅश ऑपरेशन्समधील आहेत.

गुगलने जानेवारी महिन्यातही शेकडो कर्मचाऱ्यांना काढले होते. यामध्ये इंजिनीअरिंग, हार्डवेअर आणि सपोर्ट टीमचा अधिक समावेश होता. कंपनीने एआय क्षेत्रात आपली गुंतवणूक वाढवली आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी या वर्षाच्या सुरुवातीला कर्मचाऱ्यांना नोकऱ्या कपातीबाबत इशारा दिला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top