Home / News / चंदगडच्या तेऊरवाडीमध्ये वानरांच्या कळपाचा धुडगूस

चंदगडच्या तेऊरवाडीमध्ये वानरांच्या कळपाचा धुडगूस

कोल्हापूर- चंदगड तालुक्यातील तेऊरवाडीत रानटी हत्ती आणि गव्यानंतर आता वानरांच्या कळपाने अक्षरशः धुडगूस घातला आहे.सुमारे ३५ वानरांचा हा कळप घरांवर...

By: E-Paper Navakal

कोल्हापूर- चंदगड तालुक्यातील तेऊरवाडीत रानटी हत्ती आणि गव्यानंतर आता वानरांच्या कळपाने अक्षरशः धुडगूस घातला आहे.सुमारे ३५ वानरांचा हा कळप घरांवर उड्या मारत फळबागांमध्ये घुसून फळांचे नुकसान करत आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या या तेऊरवाडीच्या उत्तरेला जंगल आहे.या जंगलातूनच हा वानरांचा कळप गावात घुसतो. ही माकडे घरावर उड्या मारत कौले फोडत आहेत.तसेच गावातील फळबागांमध्ये शिरून कोवळे नारळ,पेरू, शेवगा आदी फळ भाज्या नष्ट करत आहेत.या वानरांना हाकलण्याचा प्रयत्न केला तर ते कळपाने अंगावर चाल करून येत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये या वानरांची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.तरी ग्रामस्थ आणि वनविभागाने संयुक्त मोहीम राबवत या वानरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.

Web Title:
संबंधित बातम्या