चीनच्या ९ लष्करी वरिष्ठांची संसदेतून हकालपट्टी

बीजिंग :

चीनने ९ वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची संसदेतून हकालपट्टी केली आहे. त्यात देशाच्या रॉकेट फोर्सच्या ४ जनरलचा समावेश आहे. चीनच्या नेतृत्वाने या कारवाईचे कोणतेही ठोस कारण दिलेले नाही. मात्र, भ्रष्टाचाराच्या चौकशीमुळे त्यांना काढून टाकल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

बडतर्फ केलेल सर्व अधिकारी चीनच्या नॅशनल पीपल्स काँग्रेसचे सदस्य होते. त्यातील ४ जण जनरल हुद्द्याचे अधिकारी होते आणि ते रॉकेट फोर्सचे सेनानी होते. या दलाकडे चीनच्या अण्वस्त्रांची आणि लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची जबाबदारी आहे. काही महिन्यांपूर्वी चीनने त्यांचे संरक्षण मंत्री ली शांगफू यांना असेच अचानकपणे पदावरून हटवले होते. तत्पूर्वी ते अनेक दिवस सार्वजनिक जीवनातून दिसेनासे झाले होते. चीनमध्ये अशा प्रकारे वरिष्ठ अधिकारी गायब होण्याचे प्रकार वाढले आहेत. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी सेनादलांतील भ्रष्टाचाराविरुद्ध मोहीम उघडली असून त्याचा हा परिणाम असल्याची चर्चा होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top