छत्तीसगडसह १२ राज्यांत१४ एप्रिलपर्यंत पाऊस महाराष्ट्रात अवकाळीचा हाहाकार

मुंबई :

देशभरात दोन वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय असल्याने उन्हाळ्यात अनेक भागात पाऊस आणि गारपीट होत आहे. काल महाराष्ट्रासह मध्य प्रदेशमध्ये पाऊस आणि गारपीट झाली. त्यामुळे तापमानात घट झाली. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, पंजाब, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार, तेलंगणा, केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये १४ एप्रिलपर्यंत अवकाळी पाऊस सुरू राहील. दरम्यान, राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक भागात अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.

एकीकडे देशात पावसाळ्यामुळे अनेक भागात तापमानात घट झाली आहे, तर दुसरीकडे काही भागात पावसाअभावी उष्णतेचा प्रभाव कायम आहे. देशातील १२ राज्यांमध्ये १४ एप्रिलपर्यंत पावसाळा सुरू राहणार असून १३ आणि १४ एप्रिलला जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या काही जिल्ह्यांमध्ये बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. राज्यात नागपूरसह विदर्भाच्या काही भागात गेल्या २४ तासांत मुसळाधार अवकाळी पाऊस झाला. काही भागात गारपीट झाल्याने भाजीपाला,फळपिकांचे मोठे नुकसान झाले. विदर्भात नागपूर, अमरावती, अकोला व बुलढाणा शहरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने नुकसान झाले आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्याच्या विविध भागांत पुढील चार ते पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top