जपानच्या भूकंपातील मृतांची संख्या २०३ वर

टोकियो – जपानच्या इशिकावा प्रांतात पश्चिम किनारपट्टीला नववर्षांच्या पहिल्याच दिवशी शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला होता.तब्बल ७.६ रिश्टर स्केल तीव्रतेच्या या भूकंपातील मृतांची संख्या बुधवारी वाढून २०३ झाली.
या भूकंपातील ६८ लोक अद्याप बेपत्ता आहेत. मृतांमधील सात जणांचे मृत्यू हे निर्वासित शिबिरांमध्ये झाले आहेत.मात्र हे मृत्यू आजारपणामूळे आणि जखमी स्थितीत झाले असल्याची माहिती
इशिकावा प्रीफेक्चरचे आपत्ती अधिकारी शिगेरू निशिमोरी यांनी दिली.

शिगेरू निशिमोरी यांनी सांगितले की,सुझू शहरातील सहा आणि नोटो शहरातील एकजणाचा मृत्यू हा भुकंपामुळे ,आगीमुळे आणि चिखलामुळे झालेला नाही. या भूकंपात ३० हजार लोक बेघर झाले आहेत. या सर्वांना शाळा आणि तात्पुरत्या जागेत आश्रयास ठेवले आहे.भुकंपातील २०३ मृतांमध्ये सुझूमध्ये ९१, वाजिमामध्ये ८१, अ‍ॅनामिझूमध्ये २०, नानाओमध्ये ५ , नोटोमध्ये ३, शिकामध्ये २ आणि हाकुईमधील एकाचा समावेश आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top