Home / News / जाट चित्रपटाच्या टीमसह सनी देओलवर गुन्हा दाखल

जाट चित्रपटाच्या टीमसह सनी देओलवर गुन्हा दाखल

मुंबई – अभिनेता सनी देओल आणि रणदीप हुड्डा यांची मुख्य भूमिका असलेला जाट हा चित्रपट १० एप्रिल २०२५ ला प्रदर्शित...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

मुंबई – अभिनेता सनी देओल आणि रणदीप हुड्डा यांची मुख्य भूमिका असलेला जाट हा चित्रपट १० एप्रिल २०२५ ला प्रदर्शित झाला. परंतु हा चित्रपट प्रदर्शनानंतर एका दृश्यामुळे ख्रिश्चन धर्माच्या भावना दुखावल्याबद्दल वादात अडकला आहे. अभिनेता सनी देओल, रणदीप हुड्डा, विनीत कुमार सिंह, दिग्दर्शक गोपीचंद मालिनेनी आणि निर्माता नवीन येरनेनी यांच्याविरुद्ध पंजाबमधील जालंधर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
या चित्रपटातील दृश्यात खलनायकाची भूमिका करणारा अभिनेता रणदीप हुड्डा एका चर्चमधी क्रूसाखाली उभा आहे. तर इतर सदस्य प्रार्थना करत आहेत. या दृश्यात चर्चमध्ये गुंडगिरी आणि धमकीचे चित्रीकरण आहे. यावर ख्रिश्चन समुदायाने आक्षेप घेत चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

Web Title:
संबंधित बातम्या