जातींमधील मागासलेपणा तपासण्याचे निकष निश्चित

पुणे- मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असताना आज दुपारी पुण्यात राज्य मागासवर्ग आयोगाने बैठक घेतली. आजच्या बैठकीत मराठा समाजासह, ओबीसी आणि इतर खुल्या प्रवर्गातील जातींमधील मागासलेपणा तपासण्याचे 20 निकष निश्चित करण्यात आले. मागासवर्ग आयोग सर्व जातींचे सर्वेक्षण करणार आहे.

या निकषांच्या आधारे प्रश्नावली निश्चित होईल आणि दहाच दिवसांत सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे. त्यासाठी एक लाखांहून अधिक शासकीय कर्मचारी कामाला लावणार आहेत. राज्यात घरोघरी जाऊन हे सर्वेक्षण होणार आहे. सर्वेक्षणाच्या कामासाठी जिओ टॅगिंगचा उपयोग करण्यात येणार आहे. साधारणपणे दोन महिन्यांत हे सर्वेक्षण पूर्ण करण्याचा मानस राज्य मागासवर्ग आयोगाने व्यक्त केला आहे. मागासवर्ग आयोगाच्या सदस्याने सांगितले की, सर्वेक्षण सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मुद्द्यावर केले जाते. त्यात सामाजिक मुद्द्याला जास्त महत्व आहे. आम्ही कोणाच्याही मागणीवरुन काम करत नाही. मागासवर्ग आयोग ही एक न्यायिक संस्था असून आम्ही ठरलेल्या कार्यक्रमानुसारच काम करतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top