थंड हवेच्या महाबळेश्वरचा पारा ३२ अंशावर पोहचला

महाबळेश्वर- सातारा जिल्ह्यातील ‘मिनी काश्मीर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या थंड हवेच्या महाबळेश्वरमध्ये सध्या उन्हाचे चटके जाणवत आहेत.समुद्रसपाटीपासून १३७२ मीटर उंचीवर असलेल्या या महाबळेश्वरमध्ये तापमानाचा पारा ३२ अंशांवर पोहचला आहे.

महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण असल्याने देश- विदेशातील भरातील लाखो पर्यटक एप्रिल- मे महिन्यात दाखल होत असतात. याठिकाणी असलेल्या वेण्णा लेकला तर संध्याकाळी मुंबईतील चौपाटीचे स्वरुप येत असते.मात्र यंदा याच महाबळेश्वरच्या तापमानात चांगलीच वाढ होऊ लागली आहे.सकाळी साडेअकरा ते चार वाजेपर्यंत ३२ अंश तर संध्याकाळचे तापमान १८ अंशापर्यंत घसरत आहे. उकाडा कमी करण्यासाठी मुख्य बाजारपेठेत मोठा मंडप टाकला आहे. ऐन उन्हाळ्यात ही स्थिती असल्याने नागरिकांना पुढील महिन्यात भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top