दुबई आणि पाकिस्तानात पावसाचे थैमान! 50 मृत्यू

दुबई- संयुक्त अरब अमिरातीमधील (युएई) दुबई, बहारीन, कतार आणि ओमानमध्ये पावसाने गेले काही दिवस अक्षरशः थैमान घातले आहे. पाकिस्तानातही मुसळधार पाऊस कोसळतो आहे. या पावसाने आतापर्यंत 50 जणांचा बळी घेतला आहे.
दुबई, ओमान, बहारीन, कतार आणि सौदी अरबमध्ये मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण झाली आहे. दुबईचे विमानतळ पाण्याखाली गेले. यामुळे जवळजवळ सर्व उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. मॉल मध्येही पाणी घुसले आहे. सोमवार रात्रीपासून पावसाने झोडपण्यास सुरूवात केली. रस्त्यावरही गुडघाभर पाणी साचले आहे. मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. हवामान खात्याने वादळाचा इशारा दिला आहे. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.
सौदी अरब, दुबईप्रमाणे पाकिस्तानात खैबर पख्तुन्वा प्रांताला पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे.पाकिस्तानच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (पीडीएमए) सांगितले की, अतिवृष्टीमुळे घडलेल्या दुर्घटनांमध्ये येथे 32 लोक जखमी झाले आहेत.दक्षिण-पश्चिम भाग म्हणजेच बलुचिस्तान आणि खैबर पख्तुन्वामध्ये पुरामुळे आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये लोकांची तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पीडीएमएने लोकांना घराबाहेर न पडण्याच्या सुचना दिल्या आहेत. पूरग्रस्त भागांतील लोकांपर्यंत मदत साहित्य पोहोचविण्याचे काम युध्द पातळीवर केले जात आहे.पाकिस्तानच्या हवामान खात्याने 22 एप्रिलपर्यंत संपूर्ण देशात मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला आहे. पावसाने आतापर्यंत 50 जणांचा बळी घेतला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top