नवी मुंबई विमानतळावर चाचणी! मुंबईत उतरणाऱ्या विमानांना फटका

मुंबई – नवी मुंबई विमानतळावर आज झालेल्या चाचणीचा मुंबईत उतरणाऱ्या विमानांना फटका बसला. नवी मुंबई विमानतळावर आज पुन्हा सकाळी ११ ते ४ वाजेपर्यंत धावपट्टी व सिग्नल यंत्रणेची चाचणी घेतली. कालही ही चाचणी झाली होती. आज झालेल्या चाचणीमुळे मुंबई विमानतळावर उतरणाऱ्या विमानांना उशीर झाला तर काही विमाने रद्द झाली. सकाळी ११ ते ४ यावेळेत मुंबई विमानतळावर २२ ते २५ विमाने उतरतात. मात्र, या चाचणीमुळे केवळ १८ विमानेच उतरली. विमान उतरवण्यासाठी इन्स्ट्रुमेंट लँडिग सिस्टीम ही चाचणी महत्त्वाची मानली जाते. ही चाचणी काही दिवसांपूर्वी होणार होती. मात्र मुंबई परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे होऊ शकली नव्हती. ती चाचणी आज होत असल्याने मुंबईत उतरणाऱ्या विमानांना उशीर झाला होता. मात्र, मुंबईतून उड्डाण करणाऱ्या विमानांना याचा कोणताही फटका बसला नाही.

Share:

More Posts