Home / News / निकालानंतर प्रथमच वळसे-पाटील -शरद पवार भेट

निकालानंतर प्रथमच वळसे-पाटील -शरद पवार भेट

मुंबई- विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर प्रथमच अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे-पाटील यांची आज दुपारी मुंबईच्या यशंवतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी...

By: E-Paper Navakal

मुंबई- विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर प्रथमच अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे-पाटील यांची आज दुपारी मुंबईच्या यशंवतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची भेट झाली. या भेटीनंतर वळसे-पाटील यांनी माध्यमांशी सांगितले की, आमची भेट राजकीय नव्हती. फक्त मी शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले. आज यशंवतराव चव्हाण विश्वस्त प्रतिष्ठान मंडळाची बैठक होती. मी मंडळाचा विश्वस्त असल्यामुळे या बैठकीत सहभागी झालो. यानिमित्त शरद पवारांची भेट झाली . त्यांचे आशीर्वाद घेतले. आमच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. या बैठकीत आम्ही प्रतिष्ठानबाबतच्या वेगवेगळ्या मुद्यांवर चर्चा केली. शरद पवार यांनी निवडणुकीच्या सभेत माझ्याबद्दल काही बोलते ते मी आता विसरुन गेलो आहे. निवडणूक निकाल विचित्र लागला इतकेच ते निकालाबाबत बोलले.

Web Title:
संबंधित बातम्या