नेरुळ खाडी परिसरात तीन फ्लेमिंगोचा मृत्यू

नवी मुंबई :

नेरुळ सेक्टर ५८ खाडीकिनारी दोन फ्लेमिंगो पक्षी मृतस्वस्थेत आढळले. तर पामबीच रस्त्याच्या कडेला एक फ्लेमिंगो मृत अवस्थेत आढळून आला. आज पहाटे फ्लेमिंगो पाम बीच रस्त्यावर आढळून आले असून, त्यातील एकाचा गाडीला धडकून मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

फेब्रुवारी महिन्यातही अशाच प्रकारे नेरुळ जेट्टीकडे जाणाऱ्या रस्त्यावर फलकाला धडकून चार फ्लेमिंगो पक्ष्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे नवी मुंबई खाडीकिनारा आता फ्लेमिंगो पक्ष्यांसाठी सुरक्षित आहे की नाही, असा प्रश्न पर्यावरणप्रेमी करीत आहेत. सर्व फ्लेमिंगोचे मृतदेह ताब्यात घेतले असून, त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे. तसेच या प्रकरणी चौकशीही केली जाईल, असे कांदळवन विभागाचे अधिकारी सुधीर मांजरेकर यांनी सांगितले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top