पुणे :
पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी दीर्घ आजाराने आज निधन झाले. मोहनसिंग राजपाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पुण्याचे महापौर झाले होते. २०१० ते २०१२ या कालावधीत त्यांनी पुण्याचे महापौरपदी होते. गेल्या महिन्यांपासून ते आजारी होते. आज सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.