Home / News / बँकेतील ठेवींवरील विम्याचे पैसे खातेदारांकडून घेणार !

बँकेतील ठेवींवरील विम्याचे पैसे खातेदारांकडून घेणार !

मुंबई- बॅंकेत ठेवलेल्या ५ लाखांपर्यंतच्या रकमेला विम्याचे संरक्षण असते. भविष्यात बँक बुडाली तरी ते पैसे खातेदाराला परत मिळत असतात.या विम्याचे...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

मुंबई- बॅंकेत ठेवलेल्या ५ लाखांपर्यंतच्या रकमेला विम्याचे संरक्षण असते. भविष्यात बँक बुडाली तरी ते पैसे खातेदाराला परत मिळत असतात.या विम्याचे हप्ते संबंधित बँक भरत असते.मात्र आता या ठेवींवरील विम्याच्या हप्त्याचे पैसे खातेदारांकडून वसूल केले जाणार असल्याचे संकेत रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाकडून मिळत आहेत.

रिझर्व्ह बॅंकेचे डेप्युटी गव्हर्नर स्वामीनाथन यांनी सांगितले की,विम्याचा हप्ता हा बँकांच्या उत्पन्न जोखमीशी जोडून बँकांच्या जोखीम व्यवस्थापनात भर घालू शकणार आहे. त्यामुळे आर्थिक प्रणालीची स्थिरता वाढणार आहे.

Web Title:
संबंधित बातम्या