बब्बर खालसा संघटनेचा नेता लखबीर सिंग दहशतवादी घोषित

ओटावा

बब्बर खालसा इंटरनॅशनल (बीकेआय) संघटनेचा नेता आणि कुख्यात गुंड लखबीर सिंह लांडा याला भारतच्या गृह मंत्रालयाने काल दहशतवादी घोषित केले. लखबीर हा सध्या कॅनडामध्ये स्थित असून तिथून तो भारताविरोधी कारवाया करत आहे. २०२१ साली मोहाली येथील पंजाब पोलिस गुप्तचर मुख्यालयावरील रॉकेट हल्ल्याच्या कटामध्ये लखबीरचा सहभाग होता.

डिसेंबर २०२२ मध्ये तरन तारानमधील सरहाली पोलिस स्थानकारवर झालेल्या हल्ल्यात देखील लखबीर सहभागी होता. लखबीर हा मुळचा पंजाबमधील असून सध्या कॅनडातील अल्बर्टा येथील एडमंटन येथे स्थित आहे. लखबीर खलिस्तान समर्थक कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होता, त्यानंतर राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) कडून त्याच्याविरुद्ध तपास सुरू करण्यात आला. गृह मंत्रालयाने काल अधिसूचना जारी करून या निर्णयाची माहिती दिली. या अधिसूचनेनुसार, लकबीर हा पाकिस्तानमधून भारतात शस्त्रे आणि आयईडी उपकरणांची तस्करी करणारा मुख्य सूत्रधार आहे. एनआयएने त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल केले आहेत. भारत सरकार आता त्याला कॅनडातून प्रत्यार्पण करून भारतात आणण्यासाठी लवकरच प्रयत्न करणार आहे. एनआयएने सप्टेंबरमध्ये लखबीर आणि पाकिस्तानस्थित हरविंदर सिंग रिंडा यांच्यासह बब्बर खालसा इंटरनॅशनलच्या ५ दहशतवाद्यांची माहिती देणार्‍यास रोख बक्षीस जाहीर केले होते.एनआयएने लखबीर आणि रिंडा यांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. याशिवाय परमिंदर सिंग कैरा उर्फ ​​पट्टू, सतनाम सिंग उर्फ ​​सतबीर सिंग आणि यादविंदर सिंग उर्फ ​​यांच्यावर प्रत्येकी ५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. हे सर्वजण लखबीरचे सहकारी आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top