बेकायदा इमारत वाचवण्यासाठी शक्कल राममंदिरासह उभारले मोदी-योगींचे पुतळे

सुरत – देव-देवतांच्या प्रतिमांचा काही लोक आपल्या स्वार्थासाठी वाट्टेल तसा वापर करतात हे आपण अनेकदा पाहिले आहे. पण एका भंगार विक्रेत्याने अनधिकृत बांधकाम वाचविण्यासाठी राम-लक्ष्मण-सीता यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मंदिरच इमारतीच्या गच्चीवर बांधले. एवढेच नव्हे तर २२ जानेवारीला अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळा होत असताना या मंदिराचे मोठा गाजावाजा करीत उद्घाटनही केले.

मोहनलाल गुप्ता असे या भंगार विक्रेत्याचे नाव आहे.गुप्ता याने अंकलेश्वरच्या गडखोल गावात गेल्या वर्षी एक घर विकत घेतले होते. त्या घरावर त्याने अनधिकृत मजला बांधला होता.त्याची तक्रार मनसुख रखासिया नावाच्या शेजार्याने भडोच-अंकलेश्वर नगर विकास प्राधिकरणाकडे केल्यानंतर या गोष्टीचा गवगवा झाला.

गुप्ताने आपल्या इमारतीच्या गच्चीवर छोटे मंदिर बांधून त्यामध्ये राम-लक्ष्मण आणि सितेच्या मूर्ती स्थापित केल्या. मंदिराच्या प्रवेशद्वारावर एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसर्या बाजूला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे पुतळे उभे केले. मोदी आणि योगी या मंदिराची राखण करीत आहेत. हा देखावा पाहून अधिकारीदेखील अवाक झाले. अधिकार्यांनी आता गुप्ताला सात दिवसांत इमारतीसंबंधीची कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top