भाजपाच्या मराठी दांडिया फक्त हिंदूंना प्रवेश

मुंबई – भारतीय जनता पार्टीच्या वतीने सलग तिस-या वर्षी काळाचौकी येथील अभ्युदयनगर येथे मराठी दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. खा. मिहीर कोटेचा, भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा चित्रा वाघ या दांडियासाठी पुढाकार घेतला आहे. या दांडियात केवळ हिंदूंना प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी दांडियाला येणार्‍यांचे ओळखपत्र पाहिले जाणार आहे, अशी माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. मात्र या दांडियाला शाहरुख किंवा सलमान खान आले तर काय, असा प्रश्न आता विचारला जात आहे.

Share:

More Posts