Home / News / भाजपाच्या सदस्य नोंदणी अभियानला सुरुवात

भाजपाच्या सदस्य नोंदणी अभियानला सुरुवात

मुंबई- विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळाल्यानंतर भाजपाने पक्षवाढीसाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी भाजपाने आजपासून राज्यभरात ‘सदस्य नोंदणी अभियान’...

By: E-Paper Navakal

मुंबई- विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळाल्यानंतर भाजपाने पक्षवाढीसाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी भाजपाने आजपासून राज्यभरात ‘सदस्य नोंदणी अभियान’ सुरू केले आहे.
या अभियानाबाबत आज दुपारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदाधिकार्‍यांची बैठक घेतली. या बैठकीत बावनकुळे यांनी अभियानांतर्गत १ कोटी ५१ लाख नवीन सदस्य नोंदणीचे लक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिले. ही बैठक संपल्यानंतर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, भाजपाला मतदान दिलेल्या सर्व जनतेने सदस्यता अभियानाच्या माध्यमातून भाजपासोबत जोडावे आणि पक्षाला मजबूत करावे.

Web Title:
संबंधित बातम्या