भारतीय वंशाचे कुटुंब अमेरिकेतील आलिशान घरात मृतावस्थेत आढळले

मॅसेच्युसेट्स- अमेरिकेतल्या मॅसेच्युसेट्स शहरात एक श्रीमंत भारतीय कुटुंब त्यांच्या आलिशान घरात मृतावस्थेत आढळले. पती-पत्नी आणि त्यांची तरुण मुलगी असे तीन मृतदेह आढळले आहेत.दोन-तीन दिवसांपासून या कुटुंबियांकडून काहीच प्रतिसाद न आल्याने त्यांचे नातेवाईक त्यांच्या घरी आले असता हे प्रकरण उघडकीस आले.
अमेरिकेतल्या मॅसेच्युसेट्स या शहरात एक श्रीमंत कुटुंब आपल्या ४१ कोटी रुपये किंमतीच्या व २७ बेडरूम असलेल्या या आलिशान घरात मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली. हे कौटुंबिक हिंसाचाराचे प्रकरण दिसत असून पतीच्या मृतदेहाजवळ पिस्तुल असल्याचे तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. टिना आणि राकेश कमाल हे दांपत्य व त्यांच्या १३ वर्षांच्या मुलीचे मृतदेह आढळले असून कमाल हे इड्यूनोव्हा नावाची एक शैक्षणिक संस्था चालवत होते. या संदर्भात तपास सुररू असून हा हत्येचा प्रकार नाही, असेही इथल्या पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या मृतदेहांच्या तपासणीनंतरच त्यावर अधिक भाष्य करता येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून हे कुटुंबिय आर्थिक विवंचनेत होते. त्यांनी आपले एकेचाळीस कोटी रुपयांचे घर कमी किमतीत विकले होते, अशी माहितीही अधिकाऱ्यांनी दिली आहे. ते कुणाच्या दहशतीखाली असल्याचेही आढळले नसून सुटीच्या काळांमध्ये अशा पद्धतीच्या कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना वाढतात. लोक पैशांच्या तंगीतून अशा प्रकारचे पाऊल उचलतात त्याबद्दल आपल्याला दुःख होते असे या प्रांताच्या अटर्नी जनरल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top