मणिपूरमध्ये मध्यरात्री पुन्हा गोळीबार! गार्डचा मृत्यू! वृत्तपत्र संपादकला अटक

इंफाळ :- मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये काल मध्यरात्री गोळीबार झाला. या धुमश्चक्रीमध्ये एका स्वयंसेवक गार्डचा मृत्यू झाला, तर दुसरीकडे भावना भडकवणाऱ्या वार्तांकनासाठी पोलिसांनी एका स्थानिक वर्तमानपत्राच्या संपादकाला अटक केली.

मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक समुदायातून काही तरुण स्वेच्छेने गस्तीसाठी पुढे येत आहेत. असाच एक ३५ वर्षीय तरुण गस्तीसाठी उभे असताना काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. हल्लेखोर व सुरक्षा रक्षक यांच्यात पहाटेपर्यंत चाललेल्या धुमश्चक्रीमध्ये त्याचा अविरत रक्तस्रावामुळे मृत्यू झाला. या काळात आत्तापर्यंत मणिपूरमधील हिंसाचारात २०० हून अधिक लोक मारले गेले आहेत.

मणिपूरमधील तणावपूर्ण वातावरणामध्ये भावना भडकवणारे वार्तांकन करत असल्याचा आरोप करत मणिपूर पोलिसांनी स्थानिक वृत्तपत्राचे संपादक वांगखेमचा श्यामजाई यांना अटक केली. पोलिसांनी ही कारवाई केल्यानंतर ऑल मणिपूर जर्नलिस्ट युनियन व एडिटर्स गिल्ड मणिपूर यांनी तिचा निषेध केला आहे. वांगखेमचा यांना ३१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश स्थानिक न्यायालयाने दिले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top