Home / News / मध्य आणि हार्बरमार्गावर मेगाब्लॉक

मध्य आणि हार्बरमार्गावर मेगाब्लॉक

मुंबई- विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी उद्या मध्य रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे लोकल...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

मुंबई- विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी उद्या मध्य रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे लोकल विलंबाने धावतील तर काही स्थानकांत लोकलच थांबणार नाही. मध्य रेल्वेवर उद्या सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत माटुंगा आणि मुलुंडदरम्यान अप आणि डाउन धिम्यामार्गावर, तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि चुनाभट्टी, वांद्रे स्थानकांदरम्यान सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत अप हार्बर मार्गावर आणि सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत डाउन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. या मेगाब्लॉकमुळे मुंबईकरांचे हाल होणार असल्याने प्रवाशांनी घराबाहेर पडण्याअगोदर वेळापत्रक व मेगाब्लॉकच्या वेळा तपासाव्यात, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Web Title:
संबंधित बातम्या