Home / News / महाराष्ट्र पोलिसांना मिळणार १२ नव्या फॉरेन्सिक व्हॅन

महाराष्ट्र पोलिसांना मिळणार १२ नव्या फॉरेन्सिक व्हॅन

मुंबई -महाराष्ट्र पोलिसांना १२ नव्या फॉरेन्सिक व्हॅन मिळणार असून या व्हॅन नागपूर, मुंबई आणि नवी मुंबई शहरांना देण्याचे राज्य सरकारने...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

मुंबई -महाराष्ट्र पोलिसांना १२ नव्या फॉरेन्सिक व्हॅन मिळणार असून या व्हॅन नागपूर, मुंबई आणि नवी मुंबई शहरांना देण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे. राज्य सरकारकडून फॉरेन्सिक व्हॅनसाठी १३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्याअंतर्गत मुंबईत ५, नवी मुंबईत २ आणि नागपुराला ५ फॉरेन्सिक व्हॅन मिळणार आहेत. नागपूर आणि नवी मुंबईत प्रत्येक झोनसाठी एक फॉरेन्सिक व्हॅन आणि मुंबईत विभागानुसार एक व्हॅन मिळणार आहे. या गुन्ह्याची उकल करण्याबाबतीत फॉरेन्सिक व्हॅन अत्यंत महत्त्वाची भूमिका असते.

Web Title:
संबंधित बातम्या