माण- खटावमध्ये परदेशी पाहुणे फ्लेमिंगोसह सोनेरी बदक दाखल

कराड- जिल्ह्यातील दुष्काळी भाग समजल्या जाणार्‍या माण – तालुक्यातील तलावांमध्ये सध्या परदेशी पाहुणे दाखल झाले आहेत.याठिकाणी फ्लेमिंगोसह काश्मिरी सोनेरी बदक आणि चक्रवाक मुक्तविहार करताना दिसत आहेत.

माण तालुक्यातील १४३ वर्षापूर्वीच्या ब्रिटिशकालीन देवापूर तलावात फ्लेमिंगो पक्षांनी पहिली हजेरी लावली आहे.तसेच खटाव तालुक्यातील सूर्याचीवाडी, येरळवाडी आणि मायनी तलावात मात्र अद्याप परदेशी पाहुणे दाखल झालेले नाही. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात दरवर्षी छोट्या छोट्या पाणवठ्यावर पाणथळी पक्षी हजेरी लावत असतात. सध्या खटाव तालुक्यातील डिस्कळ येथील गारवाडी गावातील बंधार्‍यात काश्मिरी गोल्डन बदक आणि चक्रवाक हे परदेशी पक्षी दाखल झाले आहेत. थंडीचे प्रमाण वाढले की त्यांच्या आगमनात वाढ होण्याची शक्यता आहे. माणच्या देवापूर तलावांत आतापर्यंत ४५ फ्लेमिंगो मासे,शेवाळ आणि छोटे कीटक शोधताना दिसत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top