Home / News / मुंबईच्या कांदिवलीत सोनेरी कोल्ह्याचे दर्शन

मुंबईच्या कांदिवलीत सोनेरी कोल्ह्याचे दर्शन

मुंबई : कांदिवलीतील चारकोप परिसरात सोनेरी कोल्ह्याचे दर्शन झाले. बचाव पथक आणि वन अधिकाऱ्यांनी या कोल्ह्याला नैसर्गिक अधिवासात सोडले. चारकोप...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

मुंबई :

कांदिवलीतील चारकोप परिसरात सोनेरी कोल्ह्याचे दर्शन झाले. बचाव पथक आणि वन अधिकाऱ्यांनी या कोल्ह्याला नैसर्गिक अधिवासात सोडले. चारकोप परिसरातील प्रथमदर्शी रहिवाशांना तो कुत्रा असावा असे वाटले. मात्र वन्यप्रेमींनी तो कुत्रा नसून सोनेरी कोल्हा असल्याची खात्री केली.

या कोल्ह्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. यानंतर बचाव पथक आणि वन अधिकाऱ्यांनी कोल्ह्याला पिंजऱ्यात जेरबंद करून तात्काळ नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. सोनेरी कोल्हा कांदळवन परिसंस्थेतील प्रमुख सस्तन प्राणी आहे. मुंबईचा पश्चिम किनारा, मध्य मुंबई आणि नवी मुंबईतील काही भाग, तसेच ठाणे खाडीच्या आसपास असलेल्या कांदळवनात जैवविविधतेला मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते.

Web Title:
संबंधित बातम्या