यूबीएस बँक ३० ते ३५ हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार

झुरिच
यूबीएस या स्विस बँकिंग कंपनीने कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या जून महिन्यापासून पाच टप्प्यांमध्ये ही कपात करण्यात येणार असल्याचे रिपब्लिक वर्ल्ड च्या एका अहवालात म्हटले आहे.
सध्या ही कंपनी आर्थिक विवंचनेत असून कंपनीचे कामकाज व्यवस्थित, सुनियोजित करण्यासाठी त्याचप्रमाणे त्यात सुधारणा करण्यासाठी युबीएसने टाळेबंदीचा निर्णय घेतला आहे. या कर्मचारी कपातीमधून बँकिंग कंपनीच्या खर्चात १० अब्ज डॉलरपेक्षा अधिक बचत होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, त्यामुळे त्यांच्या ३० ते ३५ हजार कर्मचाऱ्यांना नोकऱ्या गमवाव्या लागणार आहेत.
रिपब्लिक वर्ल्डच्या अहवालानुसार, यूबीएस जूनपासून पाच वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये कर्मचारी कपात करणार आहे. कंपनीमधील धोरणात्मक पुनर्रचना करण्यासाठी त्याचप्रमाणे कंपनीचा खर्च कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहेत. पाच वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये होणारी कर्मचारी कपात कदाचित ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये होऊ शकते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top