रशियाचा युक्रेनवर पुन्हा हवाई हल्ला११० क्षेपणास्त्र डागली ! १२ ठार

कीव –
रशियाने आज युक्रेनच्या कीव शहरावर पुन्हा एकदा हवाई हल्ला केला. यात १२ जण मृत्युमुखी पडले असून अनेक इमारतींचे नुकसान झाले असल्याची माहिती युक्रेनचे राष्ट्रपती व्लोदिमिर झेलेंन्स्की यांनी मेसेंजरद्वारे दिली आहे. जवळजवळ एक वर्षानंतर रशियाने केलेला हा सर्वात मोठा हवाई हल्ला आहे. या हल्ल्यात रशियाने ११० क्षेपणास्त्रे डागली. त्यातील अनेक क्षेपणास्त्रे निकामी केल्याचेही झेलेंन्स्की यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. राजधानी किवमध्ये अद्यापही काही लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याचे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top