Home / News / राजस्थानात रेशन कार्डावर ४५० रुपयांत गॅस सिलिंडर

राजस्थानात रेशन कार्डावर ४५० रुपयांत गॅस सिलिंडर

जयपूर- राजस्थानमध्ये आता रेशन कार्डवर नागरिकांना फक्त ४५० रुपयांमध्ये गॅस सिलिंडर मिळणार आहे. राजस्थान सरकारने हा निर्णय घेतला आहे. रेशन...

By: E-Paper Navakal

जयपूर- राजस्थानमध्ये आता रेशन कार्डवर नागरिकांना फक्त ४५० रुपयांमध्ये गॅस सिलिंडर मिळणार आहे. राजस्थान सरकारने हा निर्णय घेतला आहे.

रेशन कार्डधारकांना नॅशनल फूड सिक्युरिटी अ‍ॅक्ट म्हणजे एनएफएसएअंतर्गत कमीत कमी किमतीत गॅस सिलिंडर दिला जात होता. मात्र, उर्वरित आता रेशन कार्डधारकांनाही फक्त ४५० रुपयांमध्ये गॅस सिलिंडर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राजस्थान सरकारने रेशन कार्डच्या नियमांमध्ये बदल केले आहे.राजस्थान सरकारकडून सुरुवातीला फक्त उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ४५० रुपयांमध्ये गॅस सिलेंडर दिला जात होता. मात्र,आता रेशन कार्डधारकांनादेखील ४५० रुपयांमध्ये गॅस सिलिंडर दिला जाणार आहे.यासाठी नागरिकांना रेशन कार्ड आणि एलपीजी आयडी जोडावा लागणार आहे. त्यानंतरच या योजनेचा लाभ मिळणार आहे. राजस्थानमध्ये सध्या १,०७,३५,००० पेक्षा जास्त लोक नॅशनल फूड सिक्युरिटी अ‍ॅक्टच्या यादीत आहेत. त्यातील ३७ लाख परिवारांना बीपीएल आणि उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभ मिळतो. आता उरलेल्या ६८ लाख कुटुंबाना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

Web Title:
संबंधित बातम्या