राज्यपाल रमेश बैस मंगळवारी नाशिक दौऱ्यावर! प्रशासन सज्ज

नाशिक – राज्याचे राज्यपाल रमेश बैस हे येत्या मंगळवारी २१ नोव्हेंबर रोजी नाशिक दौऱ्यावर असून इगतपुरी तालुक्यातील कुशेगाव व मोडाळे गावात त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.त्यांच्या या दौर्‍यासाठी जिल्हा प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे.काल शनिवारी शासकीय सुट्टी असतानाही कामकाज सुरूच होते.

या दौर्‍यात राज्यपाल बैस हे शेतकऱ्यांशी संवाद साधतील.तसेच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नंदुरबार येथून सुरू झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रा उपक्रमांतर्गत केंद्रीय योजनांचा आढावा यावेळी घेतला जाणार आहे.इगतपुरी तालुक्यातील कुशेगाव व मोडाळे ग्रामपंचायतींत राज्यपाल बैस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल.कुशेगाव येथे नॅनो युरियाचे प्रात्यक्षिक केले जाणार आहे. यावेळी राज्यपाल बैस शेतकऱ्यांशी संवाद साधतील. त्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना सायकलींचे वाटप केले जाणार आहे.मोडाळे गावात बचत गटाच्या महिलांनी बनविलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाला राज्यपाल बैस भेट देतील. त्यानंतर राज्यपाल बैस, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार,पालकमंत्री भुसे,अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top