Home / News / रामदास आठवले यांचा वाढदिवस संघर्षदिन म्हणून साजरा करणार

रामदास आठवले यांचा वाढदिवस संघर्षदिन म्हणून साजरा करणार

मुंबई- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा 25 डिसेंबर हा वाढदिवस रिपब्लिकन पक्षाच्यावतीने...

By: E-Paper Navakal

मुंबई- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा 25 डिसेंबर हा वाढदिवस रिपब्लिकन पक्षाच्यावतीने दरवर्षी देशभर संघर्षदिन म्हणून साजरा केला जातो. येत्या 25 डिसेंबर रोजी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा वाढदिवस संघर्षदिन म्हणून देशभर साजरा करण्यात येणार आहे. रिपब्लिकन पक्षाच्यावतीने देशभरात सर्व राज्यात आणि जिल्हयांमध्ये रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमीत्त गरिब गरजूंना मोफत अन्न, वस्त्र, शाल, चादर ,ब्लँकेट ,कपडे यांचे वाटप केले जाणार आहे .देशभर रक्तदान ,आरोग्य तपासणी,मोफत औषधोपचार असे अनेक सामाजिक उपक्रम राबवून संघर्ष दिन साजरा करण्यात येणार आहे.
मुंबईमध्ये अनेक ठिकाणी रक्तदान शिबीर, विविध रुग्णालयांमध्ये फळ वाटप करण्यात येणार आहे. अनेक बुध्द विहारांमध्ये लाडू वाटप करण्यात
येणार आहे. तसेच अनेक गरिबांना थंडीपासून वाचण्यासाठी चादर, विद्यार्थ्यांना एक वही एक पेन सुध्दा वाटप करण्यात येणार आहे.

Web Title:
संबंधित बातम्या