रामलल्‍लाच्या आरतीसाठी ऑनलाईन पासची व्यवस्था

अयोध्या
अयोध्येतील राम मंदिरात 16 जानेवारीपासून सुरू होणार्‍या 7 दिवसीय धार्मिक विधीनंतर 22 जानेवारीला मंदिरात प्रभू श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. हा सोहळा पार पडल्यानंतर राम मंदिरात दिवसातून तीन वेळा आरती होणार आहे. या आरतीसाठी भाविकांना ऑनलाईन आणि ऑफलाईन मोफत पासची व्यवस्था करण्यात आली आहे.
राम मंदिरात सकाळी 6.30 वाजता शृंगार आरती, दुपारी 12 वाजता भोग आरती आणि सायंकाळी 7.30 वाजता संध्या आरती होणार आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी मंदिरातील आरतीचे ऑनलाईन बुकिंग गुरुवारपासून सुरू झाले आहे. आरती पास व्यवस्थापक ध्रुवेश मिश्रा यांनी सांगितले की, भाविकांना रामजन्मभूमी मंदिराच्या पोर्टलवरून पास ऑनलाईन बनवून मिळेल. ऑफलाईन पास श्री रामजन्मभूमी येथील कॅम्प ऑफिसमधून मिळणार आहे. ही पास सेवा मोफत असणार आहे. यासाठी आधारकार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स आणि पासपोर्ट यापैकी एक कागदपत्र द्यावे लागेल. फक्त पास असलेल्या भाविकांनाच आरतीसाठी उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाईल. प्रत्येक आरतीला फक्त 30 भाविक उपस्थित राहू शकतात. काही दिवसांनी ही संख्या वाढवता येईल.
पाससाठी श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या अधिकृत वेबसाइटला जावे, मोबाईल नंबर एंटर करावा आणि वन-टाईम पासवर्ड टाकून लॉग इन करावा. होमपेजवर ‘आरती’ विभागावर क्लिक करावे. ज्या आरतीला उपस्थित राहायचे आहे तेथे वेळेवर आणि तारखेवर क्लिक करावे. तेथे भक्ताचे नाव, पत्ता, फोटो, मोबाईल नंबर इत्यादी कागदपत्रे प्रविष्ट करावेत. ऑनलाइन पास बुक करणार्‍या भक्तांनी श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र वेबसाइटवर आरतीच्या वेळेच्या 24 तास अगोदर त्यांची उपस्थिती निश्चित करणे आवश्यक आहे. 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी वेगळा आरती पास आवश्यक नाही. आरती बुकिंगच्या वेळी घोषित केलेल्या सरकारी ओळखपत्राच्या पुराव्याची सत्यप्रत आरतीच्या दिवशी मंदिरात प्रवेश करताना सादर करणे आवश्यक आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र आरतीच्या 24 तास अगोदर भक्तांना उपस्थिती निश्चितीसाठी एसएमएस/ईमेल स्मरणपत्र पाठवले जाईल. उपस्थितीची पुष्टी करण्यासाठी, भक्तांनी वेबसाइटवर जाऊन होम – ट्रान्झॅक्शन हिस्ट्री – आरती निवडा – अपडेट फॉलो करणे आवश्यक आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top