Home / News / राहुल गांधी शुक्रवारपासून दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर

राहुल गांधी शुक्रवारपासून दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूर- काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी शुक्रवार ४ ऑक्टोबर व शनिवार ५ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

कोल्हापूर- काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी शुक्रवार ४ ऑक्टोबर व शनिवार ५ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. कसबा बावडा येथील भगवा चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते होणार असून शनिवारी होणाऱ्या संविधान सन्मान संमेलनाला ते उपस्थित राहणार असल्याची माहिती विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिली.
5 ऑक्टोबर रोजी खासदार राहुल गांधी हे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळी भेट देऊन अभिवादन करतील. त्यानंतर हॉटेल सयाजी येथे होणाऱ्या संविधान सन्मान संमेलनाला ते उपस्थित राहतील अशी माहिती आमदार पाटील यांनी दिली.

Web Title:
संबंधित बातम्या