लडाखमधील २९ रस्ते प्रकल्पांना निधी मंजूर

लेह :

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लडाख या केंद्रशासित प्रदेशात राज्य महामार्ग, प्रमुख आणि इतर जिल्हा रस्तेमार्गांचा समावेश असलेल्या २९ रस्ते प्रकल्पांसाठी ११७०.१६ कोटी रुपयांच्या निधी वाटपाला मंजुरी दिली आहे.

गडकरी एक्स पोस्टमध्ये म्हणाले की, “२०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी राष्ट्रीय महामार्ग आणि केंद्रीय रस्तेमार्ग आणि पायाभूत सुविधा निधी (सीआरआयएफ) या अंतर्गत ८ पुलांसाठी एकूण ८१८.७१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. लडाख, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश आणि भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला दुसरा केंद्रशासित प्रदेश आहे आणि मंजूर केलेल्या उपक्रमांद्वारे तेथील दुर्गम गावांशी संपर्क सुधारेल. यामुळे लडाखमधील आर्थिक गतिविधींना, विशेष करून कृषी आणि पर्यटनाला चालना मिळून सर्वांगीण पायाभूत सुविधांच्या विकासाला हातभार लागेल, अशी अपेक्षा आहे.”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top