‘लाडकी बहीण’चा तिसरा हप्ता २९ सप्टेंबरला मिळणार

मुंबई – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील तिसरा हप्ता येत्या २९ सप्टेंबर रोजी पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे.महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली.या योजनेमध्ये लाखो महिलांनी अर्ज भरले असून आतापर्यंत दोन लाखांहून अधिक महिलांना दोन हप्ते मिळून प्रत्येकी ३ हजार रुपये मिळाले आहे. आता योजनेतील दीड हजार रुपयांचा तिसरा हप्ता देण्यात येणार आहे,असे तटकरे यांनी सांगितले.