Home / News / लाडकी बहीण योजनेचे सहा नियम बदलले

लाडकी बहीण योजनेचे सहा नियम बदलले

मुंबई- राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या नियमात पुन्हा बदल करण्यात आले असून राज्य सरकारने आता एकूण सहा नियम बदलले आहे....

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

मुंबई- राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या नियमात पुन्हा बदल करण्यात आले असून राज्य सरकारने आता एकूण सहा नियम बदलले आहे. बदललेले नियम पुढीलप्रमाणे- १) या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट बँक खाते ग्राह्य धरले जाणार आहे. २) एखाद्या महिलेचा जन्म परराज्यामध्ये झाला असेल आणि तिने महाराष्ट्रात अधिवास असलेल्या पुरुषासोबत विवाह केला तर त्या महिलेला पतीच्या कागदपत्रांवर योजनेचा लाभ मिळणार आहे. ३) ग्रामस्तरीय समितीच्यामार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचन करावे लागणार आहे. त्यात काही बदल असेल तर तोही करावा लागणार आहे. ४) केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलेला लाभार्थी म्हणून ग्राह्य धरावे. मात्र, तिच्याकडून ऑफलाईन अर्ज भरून घेण्यात यावा. ५) नवविवाहित महिलेची विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल तर त्या महिलेच्या विवाह दाखल्यानुसार पतीचे रेशनिंग कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरावे. ६) ओटीपीचा कालावधी दहा मिनिटांचा करण्यात यावा .

Web Title:
संबंधित बातम्या